#PuneIssues  ‘पॉस’ मशिनमुळे धान्याचा काळाबाजार थांबला

अनिल सावळे 
सोमवार, 25 जून 2018

पुणे - स्वस्त धान्य दुकानांमध्ये पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिनद्वारे धान्य वितरण सुरू केल्यानंतर धान्य विक्रीची नोंद थेट पुरवठा विभागाच्या कार्यालयात होत आहे. यामुळे शहरातील रेशनिंग दुकानदार आवश्‍यक तेवढेच धान्य घेत आहेत. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात गोदामांमध्ये तब्बल तीन हजार ३१२ टन धान्य शिल्लक राहिले. त्यामुळे यापूर्वी शेकडो टन धान्य नेमके कोठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

शहरात ‘पॉस’ मशिनचा वापर करण्यापूर्वी एप्रिल २०१७ मध्ये अंत्योदय योजनेअंतर्गत ३४३ टन आणि दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना सहा हजार ८६४ टन धान्य वितरित करण्यात येत होते. त्या वेळी रेशन दुकानात एक किलोही धान्य शिल्लक राहत नव्हते.  मात्र या वर्षी मे महिन्यात अंत्योदय योजनेअंतर्गत २५२ टन आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना तीन हजार ६४३ टन धान्य वितरित करण्यात आले. यामुळे सध्या दर महिन्याला तीन हजार ३१२ टन धान्य शिल्लक राहत असल्याचे समोर आले आहे. 

‘पॉस’ मशिनमुळे धान्याची मोठी बचत होत आहे. हे शिल्लक धान्य नवीन लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरी भागात २०१३ मध्ये ५९ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाच्या अटीनुसार पात्र असूनही बरेच केशरी कार्डधारक लाभार्थी धान्यापासून वंचित होते. त्या लाभार्थ्यांना हे धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. 
- रघुनाथ पोटे, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर

Web Title: #PuneIssues Due to the POS machine the grain black market stopped

टॅग्स