#PuneIssues जादा दर आकारल्यास गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे - मल्टिप्लेक्‍समध्ये शीतपेय व पाण्याच्या बाटलीची छापील दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार दाखल करा, असे आवाहन सहायक नियंत्रक नि. प्र. उदमले यांनी केले आहे. यापुढे मल्टिप्लेक्‍समध्ये जादा दराने पैसे आकारल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी वैधमापन शास्त्र विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मल्टिप्लेक्‍स, हॉटेल, मॉल्स व चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी औंधमधील वेस्टएंड मॉल, कोथरूडमधील सिटी प्राइड चित्रपटगृह, केएफसी, वर्गर किंग इंडिया प्रा. लि. औंध, साफिरे फूड्‌स इंडिया प्रा. लि., सिजन मॉल, अमनोरा मॉलची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सिनेपोलिस सिनेमा, आयनॉक्‍स थिएटरमधील खाद्यपदार्थांची तपासणी केली. ही मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे उदमले यांनी सांगितले.

वैधमापन विभागाची कारवाई केवळ दिखाऊ असू नये. सर्वत्र जादा पैसे घेतले जात आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. जाहीर केलेल्या दूरध्वनीवरून आलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी आणि केलेल्या कारवाईची माहिती संबंधितांना द्यावी.
- ललिता देशमुख, ग्राहक 

येथे करा तक्रार 
जादा दर आकारल्यास ०२०- २६१३७११४ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा  aclmpune@yahoo.in या ई-मेल आयडीवर तक्रार करावी.

Web Title: #PuneIssues Multiplex Extra Rate Crime