नृत्य-गायन स्पर्धेत सहभागाची शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे - ‘सकाळ मधुरांगण’च्या ‘पुणेज्‌ रायझिंग स्टार’ या संगीत, नृत्य स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धकांसाठी नृत्य आणि गायनाची कार्यशाळा उद्या शनिवार (ता. १८) आणि सोमवारी (ता. २०) होत आहे. 

नृत्य-संगीतात रस असणारे ‘सकाळ-मधुरांगण’चे सभासद, त्यांचे कुटुंबीय आणि ‘सकाळ’च्या वाचकांना ‘पुणेज्‌ रायझिंग स्टार’ होण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेतील संगीत स्पर्धेसाठी संगीतकार अविनाश-विश्‍वजित परीक्षक आहेत. नृत्यांगना फुलवा खामकर नृत्य स्पर्धेच्या मार्गदर्शक आणि परीक्षक आहेत. ज्येष्ठ गायक प्रमोद रानडे पहिल्या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. 

या वर्षी गायनाबरोबरच नृत्य स्पर्धांमध्येही सोलो आणि ड्युएट प्रकारातल्या कार्यशाळा आणि स्पर्धा होणार आहेत. स्पर्धकांची तयारी तसेच या स्पर्धेद्वारे कला क्षेत्रात उंची गाठण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन या कार्यशाळांमधून होणार आहे. शिबिरात स्पर्धकांचे परीक्षण करून अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. अविश आर्टस अँड लाइफस्टाइल हब ही संस्था या कार्यशाळांसाठी प्रायोजक आहे. 

विजेत्यांना ‘पुणेज्‌ रायझिंग स्टार’ पुरस्काराने गौरविण्यात येईल. याशिवाय ‘मधुरांगण’ आयोजित अविनाश-विश्‍वजित प्रस्तुत ‘हृदयात वाजे समथिंग...’ या रोमॅंटिक गाण्यांच्या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतल्या सेलिब्रिटींच्या साक्षीने हजारोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधीही मिळणार आहे. या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या अरविंद जोग फाउंडेशन या संस्थेच्या आगामी महानाट्याच्या प्रयोगासाठीही या स्पर्धेतील विजेत्यांचा विचार केला जाईल. कार्यक्रमाचे प्रायोजक सूर्यशिबिर रिसॉर्ट आहेत. 

आधीच्या वर्षीचे स्पर्धक म्हणतात : 
अभिषेक सराफ (‘पुणेज्‌ रायझिंग स्टार २०१६’चा विजेता) : ‘सकाळ मधुरांगण’च्या या स्पर्धेचा विजेता होण्याचा अनुभव हा माझ्या सांगीतिक वाटचालीतला एक अविस्मरणीय अनुभव आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मला अविनाश-विश्‍वजित यांनी कार्यशाळेत केलेलं मार्गदर्शन.   

निकिता कानेटकर : मी मूळची नागपूरची. लग्न होऊन पुण्यात आल्यावर सहज म्हणून मी या स्पर्धेत सहभाग घेतला. मला अंतिम फेरीपर्यंत पोचता आलं, हे माझ्यासाठी खूपच उत्साहवर्धक ठरलं.  

अमृता दाश (पिंपरी-चिंचवड) : मी शास्त्रज्ञ म्हणून काम करते; पण गायन हा माझा लहानपणापासूनचा छंद. माझा व्यवसाय आणि इतर व्यापातून वेळ काढून रियाझ आणि वेगवेगळ्या पाश्‍चिमात्य गायन शैलीचा अभ्यास चालू ठेवत असते. ही स्पर्धा माझ्यासाठी एक व्यासपीठ देणारी ठरली. त्याबद्दल मी अविनाश-विश्‍वजित आणि ‘सकाळ’ची आभारी आहे. 

 नृत्य कार्यशाळा : शनिवार (ता. १८) सकाळी ११.३० वा. 
 गायन कार्यशाळा : सोमवार (ता. २०) सकाळी ११.३० वा. 
 दोन्ही कार्यशाळांसाठी स्थळ : अविश आर्टस अँड लाइफस्टाइल हब, पहिला मजला, लॅंडस्क्‍वेअर बिल्डिंग,               
रूपाली हॉटेलजवळ, फर्ग्युसन कॉलेज रस्ता 
 प्रत्येक कार्यशाळेचे शुल्क मधुरांगण सभासदांसाठी - रु. १३००, सदस्येतर वाचकांसाठी रु. १५०० 
दोन्ही कार्यशाळांसाठी वयोमर्यादा ५ ते ५० वर्षे 
नोंदणी शुल्क भरण्यासाठी : अविश आर्टस अँड लाइफस्टाइल हब, पहिला मजला, लॅंडस्क्‍वेअर बिल्डिंग, 
रूपाली हॉटेलजवळ, रानडे इन्स्टिट्यूटसमोर, फर्ग्युसन कॉलेज रस्ता (सकाळी ११ ते सायंकाळी ७)
कार्यशाळेचे अर्ज.......................या वेबसाईटवर उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क : ९०७५०१११४२ किंवा ८३७८९९४०७६

Web Title: Punej Rising Star