पुणेज्‌ रायझिंग स्टार बनण्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुणे - सकाळ मधुरांगणने संगीतप्रेमी कलाकारांसाठी "पुणेज्‌ रायझिंग स्टार' या संगीत, नृत्य स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले आहे. 

या स्पर्धेसाठी अविश आर्टस अँड लाइफस्टाइल हब ही संस्था स्थळ प्रायोजक आहे. संगीतकार अविनाश- विश्‍वजित हे संगीत स्पर्धेसाठी परीक्षक असणार आहेत. ज्येष्ठ गायक प्रमोद रानडे हे सुद्धा पहिल्या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतील. 
नृत्यांगना फुलवा खामकर या नृत्य स्पर्धेच्या मार्गदर्शक आणि परीक्षक असणार आहेत. 

इतर कुठल्याही स्पर्धेसारखी ही स्पर्धा नसून या स्पर्धेची सुरवातच एका मार्गदर्शनपर शिबिरातून होणार आहे. स्पर्धकांनी नेमका कशावर भर द्यावा इथपासून ते या स्पर्धेच्या माध्यमातून या क्षेत्रात उंची कशी गाठावी, याचा आढावा शिबिरात घेण्यात येईल. याचे परीक्षण करून अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. कार्यशाळेमध्ये स्पर्धकांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल. 

विजेत्यांना सकाळ मधुरांगण आयोजित "पुणेज्‌ रायझिंग स्टार' या पुरस्काराने गौरविण्यात येईल. याशिवाय मधुरांगण आयोजित अविनाश-विश्‍वजित प्रस्तुत "हृदयात वाजे समथिंग... रोमॅंटिक गाण्यांची सुरीली मैफल' या कार्यक्रमात चित्रपट सृष्टीतल्या सेलिब्रिटींच्या साक्षीने हजारोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक सूर्यशिबिर रिसॉर्ट आहेत. 

नृत्य कार्यशाळा : सोमवार ता. 13 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता, स्थळ - सकाळ मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ, पुणे 

गायन कार्यशाळा : बुधवार 15 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता, स्थळ अविश आर्टस अँड लाइफस्टाइल हब, पहिला मजला, लॅंडस्क्वेअर बिल्डिंग, रूपाली हॉटेलजवळ, रानडे इन्स्टिट्यूटसमोर, एफ. सी. रोड, डेक्कन, शिवाजीनगर, पुणे - 30. 

प्रत्येक कार्यशाळेचे शुल्क - मधुरांगण सभासद - रु. 800/- सकाळ वाचकांसाठी रु. 1000/- 

नोंदणी शुल्क आजपासून खालील ठिकाणी भरता येईल ः- 
- सकाळ मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ, मधुरांगण विभाग, दुसरा मजला पुणे (वेळ - सकाळी 11 ते 6) 
- अविश आर्टस अँड लाइफस्टाइल हब, पहिला मजला, लॅंडस्क्वेअर बिल्डिंग, रूपाली हॉटेलजवळ, रानडे इन्स्टिट्यूटसमोर, एफ. सी. रोड, डेक्कन, शिवाजीनगर, पुणे - 30. (वेळ - सकाळी 11 ते 7)
अधिक माहितीसाठी 9075011142, 8378994076 

Web Title: Punej Rising Star of the opportunity