मोफत पार्किंगमुळे पुणेकर सुखावले

मोफत पार्किंगमुळे पुणेकर सुखावले

पुणे - पार्किंगचे पैसे घेतले तर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची महापालिकेने तंबी दिल्यानंतर शहरातील अनेक मॉल, मल्टिप्लेक्‍स सुधारले आहेत. विकेंडला अवाच्या सवा पार्किंगचे शुल्क घेतले जात असताना शनिवारी (ता. २२) मॉलमध्ये मोफत पार्किंग मिळाल्याने पुणेकर सुखावले.

शहरात सुमारे ३९ मॉल आहेत. यापैकी चार पाच ठिकाणी मोफत पार्किंग उपलब्ध होते. इतर ठिकाणी १० ते १०० रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात होते. मॉल, मल्टिप्लेक्‍सचे पार्किंग मोफत उपलब्ध करून द्यावे, असा ठराव शहर सुधारणा समितीमध्ये करण्यात आला. त्यानंतर त्याबाबत मॉल, मल्टिप्लेक्‍सला नोटिसा बजाविण्यात आल्या. शुल्क घेतले तर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात  येणार आहेत.

शनिवारी, रविवारी मॉल, मल्टिप्लेक्‍समध्ये भरपूर गर्दी असते, त्यामुळे पार्किंग शुल्कही जास्त घेतले जात होते. पण, शनिवारी पुण्यातील औंध येथील वेस्ट एंड मॉल, बाणेर येथील क्रोमा, हडरसर सिझन मॉल येथे पार्किंग मोफत केले आहे. तर सिटीप्राईड, सातारा रस्ता. बाणेर, सातारा रस्ता येथील डीमार्ट, कोथरूड बिगबाझार येथेही पार्किंग मोफत आहे. दरम्यान, सोमवारी शहर सुधारणा अध्यक्ष अमोल बालवडकर हे किती ठिकाणी पार्किंग मोफत झाले याचा आढावा घेणार आहेत. 

रुग्णालय, महाविद्यालयात पार्किंग मोफत का नाही?  
पुणे महापालिकेने मॉल व मल्टिप्लेक्‍समधील मोफत पार्किंगचा फायदा केवळ उच्चभ्रूंना होणार आहे. शहरातील रुग्णालये, महाविद्यालयात पार्किंगच्या नावाखाली लूट सुरू आहे. तेथे मोफत पार्किंग का नाही?, असा प्रश्न मनसेने भाजपला केला आहे. पार्किंग मोफत केल्याने भाजप स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. पण, रुग्णालये, महाविद्यालयात हितसंबंध आडवे येत असल्याने तेथील पार्किंग मोफत केलेले नाही. ठरावीक वर्गाला खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रुग्णालये व महाविद्यालयातील पार्किंग माफिया हटविण्याची धमक भाजपने दाखवावी. तसेच शहरातील सर्वच वाहनतळ मोफत करण्याचे धोरण तयार करावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com