Pune: "तुझ्या घरात नाही गहू, म्हणे..." आक्षेपार्ह रॅपसॉंग बनवणाऱ्या पुणेकर रॅपरला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune: "तुझ्या घरात नाही गहू, म्हणे..." आक्षेपार्ह रॅपसॉंग बनवणाऱ्या पुणेकर रॅपरला अटक

सोशल मीडियावर आक्षेपार्ह रॅपसॉंग बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हे गाणं व्हायरल करणाऱ्या तरुणावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'तुझ्या घरात नाही गहू, म्हणे एलसीडी घेऊ, तुझी जागीरदारी, हा तुझी भाईगिरी, इकडे आला तर खाशील मार, अप्परची पोर गुन्हेगार" असे या गाण्याचे बोल होते.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल करणाऱ्या या तरुणावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक महबूब शेख रा. काकडे वस्ती, अप्पर इंदिरानगर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात राहायला आहे. त्याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांना घेऊन त्याने एक रॅप सॉंग तयार केलं होतं. या काही अश्लील शब्द या गाण्यात त्याने वापरले आहेत आणि ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल देखील केले

हेही वाचा: Pune Crime: थरकाप उडवणारी घटना! पोटच्या लेकीवरंच बाप, आजोबा अन् चुलत्याकडून ६ वर्षे बलात्कार

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली आणि आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या गाण्यात अनेक आक्षेपार्ह शब्द असल्याचे दिसून आले आहेत.

हेही वाचा: Pune Crime: धक्कादायक! तंबाखूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात खोरे घालून आईचा खून