पुणेकरांमध्ये स्वदेशीची भावना जास्त : शुक्‍ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

पुणे : ""पुणेकरांमध्ये स्वदेशीची भावना जास्त दिसत आहे; ती अशीच पुढे वाढत जावो,'' अशा सदिच्छा पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिल्या. 

पुणे : ""पुणेकरांमध्ये स्वदेशीची भावना जास्त दिसत आहे; ती अशीच पुढे वाढत जावो,'' अशा सदिच्छा पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिल्या. 

दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या "रास्त भावांत लाडू चिवडा विक्री' उपक्रमाचा प्रारंभ अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. ओसवाल बंधू समाज कार्यालयात हा कार्यक्रम झाला. खासदार अनिल शिरोळे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, अशोक लोढा, राजकुमार नहार आदी उपस्थित होते. बापट यांच्यासह मान्यवरांनी चेंबरच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

शुक्‍ला म्हणाल्या, ""चेंबरचे कार्य समाजाभिमुख असून, सर्वच जण एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे त्यांचे कार्य सुरू आहे.'' 
व्यापारी म्हणजे कर्तबगार व्यक्ती असल्याचे सांगत शिरोळे म्हणाले, ""ज्याची गरज आहे ते करणे म्हणजे समाजसेवा होय. गरिबांची दिवाळी गोड करण्याचे काम चेंबर या उपक्रमाच्या माध्यमातून करीत आहे.'' 

Web Title: punekars have inclination to swadeshi