#PuneMandai रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे फुले मंडई भागात कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पुणे - महात्मा फुले मंडई परिसरात अधिकृत आणि अनधिकृत पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करतात. तसेच, बहुतांश भाजी विक्रेते रस्त्यावरच गाडा थाटतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

पुणे - महात्मा फुले मंडई परिसरात अधिकृत आणि अनधिकृत पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करतात. तसेच, बहुतांश भाजी विक्रेते रस्त्यावरच गाडा थाटतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

मंडईत दुकानांसाठी उभारलेल्या गाळ्यांमध्ये माल साठविण्यात येतो. मात्र, दुकाने रस्त्यावरच थाटून व्यवसाय केला जात आहे. तसेच एका व्यक्तीस किती गाळे असावेत, याचे प्रमाण निश्‍चित नसल्याचेही पहावयास मिळाले. त्यामुळे मागील १५-२० वर्षांपासून रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांसाठी गाळे उपलब्ध होत नाही. महापालिकेचे यावर नियंत्रण नसल्याने गाळे आतील भागात आणि दुकाने रस्त्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रस्त्यावर बसणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेने ओळखपत्र दिले आहे. मात्र, त्यांच्यावर सर्रास कारवाई केली जात आहे. त्यामुळे पथारी व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, पथारीवर व्यवसाय करणाऱ्यांमुळे मंडईत ग्राहक खरेदीस येत नसल्याची तक्रार रस्त्यावर व्यवसाय करणारे गाळेधारक भाजी विक्रेते करत आहेत.

गाळे वापरत नसणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. तसेच, पथारीवर व्यवसाय करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रक्रिया राबवण्यास सुरवात करणार आहोत.
- माधव जगताप, प्रमुख,  अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका

अनधिकृत भाजी विक्रेत्यांमुळे मंडईत 
कोणी खरेदीस येत नाही. त्यांना उठवल्यास सर्वांचा व्यवसाय होणे शक्‍य आहे. 
त्यानंतर आम्ही गाळ्यात जाण्यास तयार आहोत.
- राजेंद्र शिंदे, गाळाधारक भाजी विक्रेते

मागील ३० वर्षांपासून या भागात व्यवसाय करत आहोत. महापालिकेने जूनला कारवाई केली आहे. तेव्हापासून व्यवसाय पूर्ण बंद आहे. पालिकेने मंडईत गाळे द्यावेत; तोपर्यंत कारवाई करू नये.
- अमिना शकीलकर, पथारी व्यावसायिक

Web Title: #PuneMandai traffic jam Due to the street vendors