#PuneRailway पुणे-बारामती पॅसेंजरमध्ये जुगाराचा अड्डा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे - पुणे-बारामती पॅसेंजर रेल्वेगाडीतील तीन-चार डबे हे जुगाराचे अड्डे झाले आहेत. त्याकडे रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. 

या गाडीला प्रवाशांची गर्दी असते. ही गाडी बारामतीला रात्री १०.१५ वाजता पोचते, तर सकाळी ७ वाजून पाच मिनिटांनी बारामतीहून सुटते आणि पुण्याला सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पोचते. 

पुण्याहून सुटणाऱ्या गाडीने हडपसर सोडल्यावर ६, ७  व ८ व्या डब्यामध्ये जुगाराचे अड्डे सुरू होतात. त्यासाठी पत्ते खेळणारे काही गट जागा धरून बसतात. त्यांच्या दादागिरीमुळे अन्य प्रवाशांना तेथे बसता येत नाही. याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु, त्यावर कार्यवाही झालेली नाही.

जर एखाद्या प्रवाशाने संबंधित डब्यात बसण्याचा प्रयत्न केला तर दमबाजीसह धक्काबुक्की करून त्याला तेथून उठविले जाते. महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिकांनाही या मोकळ्या जागांवर बसू दिले जात नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहून प्रवास करावा लागतो.
- एक प्रवासी विद्यार्थी

Web Title: #PuneRailway Pune baramati Passenger Jugar Spot