पुणेरी पाट्यांची पोलिसांनाही भुरळ!

पुणेरी पाट्यांची पोलिसांनाही भुरळ!

पुणे - एखाद्या विषयावर किंवा प्रश्‍नावर अचूक, खोचक व नर्मविनोदी शैलीत टिप्पणी करणाऱ्या पुणेरी पाट्यांची भुरळ पुणे पोलिसांनाही पडली आहे. खदखदून हसवणाऱ्या आणि वेळप्रसंगी जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या या पाट्यांचा उपयोग करून पोलिस आता नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरणार आहेत; तसेच पोलिसांच्या कार्यतत्परतेची जाणीवही करून  देणार आहेत.

मार्मिक शब्दांतून एखाद्याला त्या-त्या विषयाचे महत्त्व पटवून देणाऱ्या पुणेरी पाट्या देशात प्रसिद्ध आहेत. माणसाच्या हृदयावर राज्य गाजवीत त्यास निखळ आनंद देण्याचे काम या पाट्या करतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे कार्य समजावून सांगतानाच नागरिकांना वाहतुकीचे नियम पटवून देण्यासाठी या पाट्यांची मदत घेतली आहे.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी या पाट्यांद्वारे पुणेकरांना पोलिसांचे सध्या सुरू असलेले काम, वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांसह वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी या पाट्यांमधून मार्मिकपणे संदेश देण्याचे ठरविले आहे. त्यास भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव 

पुष्कराज पाठक यांनी साथ दिली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच पुणेरी पोलिस पाट्या तयार झाल्या. या उपक्रमाचे उद्‌घाटन डॉ. वेंकटेशम यांच्या हस्ते झाले. 

अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे आदी या वेळी उपस्थित होते.

सोशल मीडियाच्या अगोदर कित्येक वर्षांपासून पुणेरी पाट्यांनी आपल्या संस्कृतीला साजेसा वेगळेपणा सिद्ध केला आहे. पोलिस खात्यात कायम तणाव असतो. अशा तणावपूर्ण वातावरणातही नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी पुणेरी पाट्यांचा उपयोग होईल.
-डॉ. के. वेंकटेशम,  पोलिस आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com