बारामती : नटराजच्या एकांकीका स्पर्धेत पुण्याची 'अल्पविराम' एकांकीका प्रथम

बारामती : नटराजच्या एकांकीका स्पर्धेत पुण्याची 'अल्पविराम' एकांकीका प्रथम

बारामती : येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या 35 व्या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील स्नेहस्मित संस्थेच्या अल्पविराम या एकांकीकेस प्रथम क्रमांक व नटराज करंडक मिळाला.

कोरोनानंतर हौशी एकांकीकेसाठी ग्रामीण भागात नटराजने प्रथमच व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थांनी आभार व्यक्त केले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत ही स्पर्धा पार पाडल्याचे अध्यक्ष किरण गुजर यांनी सांगितले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकच दिवस स्पर्धा आयोजित केली गेली. यंदा नऊ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे- द्वितीय क्रमांक- आमचे आम्ही,पुणे ( एकांकिका - लव्ह इन रिलेशनशिप ), तृतीय क्रमांक- रंगपंढरी, पुणे ( एकांकिका - बिनविरोध ), उत्तेजनार्थ एकांकिका-  कलासक्त, मुंबई (एकांकिका - हिरविन ), समांतर, सांगली ( शेवट तितका गंभीर नाही ), सर्वोत्कृष्ठ अभिनय-स्त्री – ऋतुजा भूमिकेसाठी शुभांगी जाधव, सर्वात्कृष्ठ अभिनय – पुरुष- मिहिर भूमिकेसाठी प्रणव जोशी,  अभिनय उत्तेजनार्थ -स्त्री - राजश्री जमदाडे, अभिनय उत्तेजनार्थ – पुरुष- मयूर पाटील, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन -  मनोज डाळिंबकर, नेपथ्य - कविता निकाळजे, रंगभूषा - वेशभूषा चे पारितोषिक देखील रंग पंढरी, पुणे यांनी सादर केलेल्या बिनविरोध एकांकिकेस मिळाले. 

संस्थेचे सभासद संजय जाधव, विनोद रावळ, रामचंद्र गोंजारी, संजय खडके,संजय मोरे, अमर महाडीक, सचिन आगवणे, अक्षय महाडीक, श्रीकांत गालिंदे, विनय आगवणे, संकेत नरुटे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली गेली. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com