पुणेकरांची स्मार्ट आयडिया; उन्हापासून कमी खर्चात सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

वाढत्या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. पण पुणेकरांनो उन्हाच्या झळांपासून तुम्हाला आता दिलासा मिळणार आहे. कारण पुण्यातील काही चौकात सिग्नलवर सावलीसाठी नेट लावण्यात आले आहे. त्यामुळे भर उन्हात सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांना काही क्षण का असेना सावली मिळत आहे. 

पुणे : पुणेकरांना उन्हापासून वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी नेट लावण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागात 20 चौकात असे नेट लावण्याचे काम सुरू आहे. अप्पाबळवंत, समाधान, बुधवार पेठ मजूर अड्डा चौकात आदी 9 चौकात नेट लावून झाले आहे.

नगरसेवक हेमंत रासने यांनी या उपक्रमासाठी दिड लाख रुपये खर्च केला आहे. नागपुरमध्ये केंद्रिय मंत्री नितिन गडकरीं यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्याचेच अनुकरण करत हा उपक्रम पुण्यातही राबविण्यात आला आहे. 

वाढत्या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. पण पुणेकरांनो उन्हाच्या झळांपासून तुम्हाला आता दिलासा मिळणार आहे. कारण पुण्यातील काही चौकात सिग्नलवर सावलीसाठी नेट लावण्यात आले आहे. त्यामुळे भर उन्हात सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांना काही क्षण का असेना सावली मिळत आहे. त्यात या नेट झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे लावल्याने झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे कधी नव्हे ते मोकळे दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punes people smart idea for save from hot summer