सुटीहून परतलेल्या पुणेकरांची रिक्षा, कार चालकांकडून लूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

गावाहून रात्री उशिरा परतलेल्या पुणेकरांची रिक्षावाल्यांनी लूट केली. शिवाजीनगर येथून आपल्या घरी जाण्यासाठी लोकांना किमान २०० ते दोन हजार रुपये मेजावे लागत होते. बसस्थानकात एसटी बससाठी जागा नसल्याने साध्या एसटी बस पासून शिवशाहीतून येणाऱ्या प्रवाशांना सिमला ऑफिस ते कृषी महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्यावर उतरविण्यात येत होते.

पुणे : दिवाळीची सुटी संपून आज (सोमवार) शाळा सुरू होत असल्याने गावाकडे गेलेली मंडळी रविवारी पुण्यात परतली. मात्र, त्यांना रिक्षावाले आणि खासगी टुरिस्ट कारवाले यांच्या मुजोरीला सामोरे जावे लागले.

गावाहून रात्री उशिरा परतलेल्या पुणेकरांची रिक्षावाल्यांनी लूट केली. शिवाजीनगर येथून आपल्या घरी जाण्यासाठी लोकांना किमान २०० ते दोन हजार रुपये मेजावे लागत होते. बसस्थानकात एसटी बससाठी जागा नसल्याने साध्या एसटी बस पासून शिवशाहीतून येणाऱ्या प्रवाशांना सिमला ऑफिस ते कृषी महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्यावर उतरविण्यात येत होते. त्यामुळे मध्यरात्रीनंतरही तेथे एसटी बसची रांग , प्रवाशांची आणि रिक्षांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच रिक्षावाल्यांकडून पैशासाठी होत असलेल्या अडवणुकीमुळे प्रवाशांची अवस्था केविलवाणी झाली होती.

कोणताही पर्याय नसल्याने गावाहून पुण्यात येण्यासाठी लागलेल्या एसटीच्या तिकीटाच्या रकमेच्या तिप्पट, चौपट रक्कम येथून घरी जाण्यासाठी मोजावी लागली. ओला, उबर बुक केलेल्या अनेकांचे बुकिंग रद्द झाल्याचे कळवून संबंधित चालक अडलेल्या प्रवाशांकडून मनमानेल तेवढे पैसे घेत असल्याचे दिसले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punes peoples pay extra money for transport on rickshaw and car