पुण्याचे पाणी केरळला रवाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातून मध्य रेल्वेने विशेष रेल्वे मालगाडीच्या 14 वॅगनमधून सात लाख लिटर पाणी केरळातील तिरुअनंतपुरमकडे रवाना केले. दरम्यान, लोणावळ्यातून चार वॅगन आणि रतलामहून पाण्याने भरलेली 15 वॅगनची मालगाडी या गाडीला जोडल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. 

पुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातून मध्य रेल्वेने विशेष रेल्वे मालगाडीच्या 14 वॅगनमधून सात लाख लिटर पाणी केरळातील तिरुअनंतपुरमकडे रवाना केले. दरम्यान, लोणावळ्यातून चार वॅगन आणि रतलामहून पाण्याने भरलेली 15 वॅगनची मालगाडी या गाडीला जोडल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. 

शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घोरपडीतील कोचिंग कॉम्प्लेक्‍स येथे शंभर टॅंकरमधून पाणी भरण्याचे काम करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास 14 वॅगनमध्ये पाणी भरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर इंजिन जोडून केरळच्या दिशेने रवाना करण्यासाठी मालगाडी सज्ज केली. पुण्यातून 14 आणि रतलाममधून 15 अशा 29 वॅगनची रेल्वे मालगाडी केरळच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्याशिवाय लोणावळा येथून अतिरिक्त चार वॅगन देखील या गाडीला जोडण्यात येणार आहेत. त्यामधून एकूण 14 ते 15 लाख लिटर पिण्याचे पाणी केरळकडे रवाना झाले. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही गाडी केरळच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, रविवारी मध्यरात्रीनंतर ती केरळ राज्यात दाखल होईल, असेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

विशेष रेल्वे मालगाडी 
- एकूण अंतर 1 हजार 20 किलोमीटर 
- पुण्यातून 14 वॅगन; रतलाममधून 15 वॅगन 
- एकूण वॅगन 29 
- सुमारे 14 ते 15 लाख लिटर पिण्याचे पाणी 

Web Title: Punes water supply for Kerala way to railway