#PuneTheater मौलाना अबुल कलाम स्मारकाला अवकळा 

दिलीप कुऱ्हाडे 
शुक्रवार, 8 जून 2018

येरवडा - कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर 270 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह आणि तळमजल्यावर बहुउद्देशीय सभागृह आहे. मात्र देखभाल व दुरुस्तीअभावी सध्या या स्मारकाला अवकळा आली आहे. 

येरवडा - कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर 270 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह आणि तळमजल्यावर बहुउद्देशीय सभागृह आहे. मात्र देखभाल व दुरुस्तीअभावी सध्या या स्मारकाला अवकळा आली आहे. 

महानगरपालिकेने उच्चभ्रू सोसायट्यांना शोभणाऱ्या या स्मारकची वास्तू गेल्या काही वर्षांपूर्वी साकारली आहे. प्रेक्षागृह व बहुउद्देशीय सभागृहात संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांच्या सभा, परिषदा, कवी संमेलन, स्नेहसंमेलनापासून ते बालनाट्याचे प्रयोग होत होते. मात्र या देखभाल व दुरुस्तीअभावी अनेक संस्था व संघटना या ठिकाणी कार्यक्रम घेण्याकडे पाठ फिरविली आहे. अपवाद वगळता काही राजकीय पक्षांसह विविध कंपन्यांच्या बैठका या ठिकाणी होत आहेत. 

स्मारकातील प्रेक्षागृहातील सिलिंगचे वॉल निखाळले असून, खुर्च्याही तुटलेल्या आहेत. येरवड्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील शिल्लक खुर्च्या या ठिकाणी बसविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. वातानुकूलन यंत्रणा दुरुस्तीच्या नावाखाली सभागृह जागोजागी उचकटून ठेवले आहे. पायऱ्यांच्या फरश्‍या निखळल्या आहेत. स्मारकाच्या भिंतीवर व पायऱ्यांवर वडाचे वृक्ष वाढलेले आहेत. त्यामुळे या वृक्षांच्या मुळांमुळे भिंतीला तडे गेले आहेत. 

वातानुकूलन यंत्रणा बंद 
स्मारकातील वातानुकूलन यंत्रणाही सध्या बंद आहे. तसेच अंतर्गत वीज वाहिन्यादेखील नादुरुस्त असून, प्रवेशद्वाराशेजारी असलेले कारंजे बंद आहे. परिसरातील ब्लॉक निघाले आहेत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहेत. स्मारकाचा नामफलकही पडला आहे. हे स्मारक लाकडाच्या कलाकुसरीतून तयार केले आहे. परंतु अग्निशमन यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात आली नसल्याचे दिसून येते. 

स्मारकाच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण दिले जाते. महापालिकेच्या भवन, विद्युत आणि उद्यान विभागाने एकत्रितपणे काम केल्यास पुन्हा मौलाना अबुल कलाम स्मारकाला गतवैभव येऊ शकते. 
-रोहित जगताप, सहायक व्यवस्थापक, मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक 

Web Title: #PuneTheater Maulana Abul Kalam Azad Memorial at Koregaon Park

टॅग्स