तुपे नाट्यगृहासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा 

संदीप जगदाळे 
मंगळवार, 5 जून 2018

हडपसर - येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे भूमिपूजन २००९ मध्ये झाले. प्रत्यक्ष बांधकामास २०१०-११ मध्ये सुरवात झाली. तब्बल २२ कोटी ९० लाख रुपये खर्चून सहा महिन्यांपूर्वी नाट्यगृहाची इमारत उभी राहिली. मात्र अद्यापही अंतर्गत कामे मार्गी लागलेली नाहीत. निधीच्या उपलब्धतेनुसार कामे सुरू असल्याने अजूनही वर्ष-दीड वर्ष नाट्यगृहात नाटकाची घंटा वाजण्यासाठी कलाकारांसह नाट्यरसिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.  

हडपसर येथील माळवाडीत हे नाट्यगृह आहे. नाट्यगृहाच्या कामासाठी चालू आर्थिक वर्षात ४ कोटी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. नाट्यगृह सुरू झाल्यास हडपसर भागातील सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीस चालना मिळेल; परंतु महापालिकेच्या संथ कारभारामुळे नाट्यगृहाचा खर्च मात्र वाढतोय. एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह असून, वातानुकूलन यंत्रणा, खुर्च्या बसवायच्या आहेत. स्वतंत्र कलादालन, अत्याधुनिक ग्रंथालयदेखील आहे.  

उपअभियंता विनोद क्षीरसागर म्हणाले, ‘‘अंतिम टप्प्यातील कामे मार्गी लागल्यावर नाट्यगृह नागरिकांसाठी खुले करण्यात येईल. नाट्यगृहात कॅटवॉक; तसेच इलेक्‍ट्रिकची कामे, परिसरातील काँक्रिटीकरण, फायर सिस्टिम, स्टॉर्म वॉटर लाइनिंग, रंगरंगोटी, पिओपी, पंप हाउस, परिसर सुशोभीकरण यांसारखी कामे प्रगतिपथावर आहेत.’’ 

नाट्यगृहात अत्याधुनिक ध्वनिप्रकाश यंत्रणा, लिफ्ट, सरकत्या जिन्याची व्यवस्था असेल. तळमजल्यावर २४२ चारचाकी वाहने, ४५० दुचाकी वाहने व पाच बस पार्क करता येतील, अशा पद्धतीचे वाहनतळ आहे. उपाहारगृहाची व्यवस्थाही असेल. ५७६७.६४ चौरस मीटर क्षेत्रफळातील या नाट्यगृहाच्या परिसरात प्रशस्त पार्किंग व तीन मजले असतील.
-सागर कुमावत, कनिष्ठ अभियंता, महापालिका भवन व रचना विभाग

(उद्याच्या अंकात - सिंहगड रस्‍ता येथील श्री शिवाजीराजे भोसले नाट्यगृहाची सद्यःस्थिती)

Web Title: PuneTheatre issue