न्यायालयाच्या इमारतीत अस्वच्छता करणाऱ्यांना शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punishment for those who litter court building junnar

न्यायालयाच्या इमारतीत अस्वच्छता करणाऱ्यांना शिक्षा

जुन्नर : येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये अस्वच्छता करणाऱ्या तिघांना फरशी पुसणे, झाडून घेणे तसेच आर्थिक दंड स्वरूपात शिक्षा करण्यात आली आहे. या इमारतीत न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. जुन्नर न्यायालयाच्या नवीन इमारतीत स्वच्छता राहवी यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून अस्वच्छता करणाऱ्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.नागरिकांनी आत येताना आपल्या जवळील पान,तंबाखू,गुटखा आदी तत्सम पदार्थ बाहेरील बॉक्समध्ये काढून नंतर आत प्रवेश करावा अशी सूचना नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारात लावण्यात आली आहे.

सहन्यायाधीश इमारतीत फिरून पाहणी करत आहेत. अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तीवर लगेच कारवाई केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते या नवीन आकर्षक इमारतीचे नुकतेच उदघाटन झाले. यावेळी न्याय मंदिराचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे न्यायमूर्ती ओक यांनी सांगितले होते. न्यायालयात येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता राखण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. घरात स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता ही मानसिकता बदलण्याची खरी आवश्यकता आहे.

Web Title: Punishment For Those Who Litter Court Building Junnar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..