पुणे : आरोपींना स्वखर्चाने पाणवठा तयार करण्याची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वनक्षेत्रात आरोपींनी तयार केलेला पाणवठा.

पुणे : आरोपींना स्वखर्चाने पाणवठा तयार करण्याची शिक्षा

फुलवडे - घोडेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत दोन वेगवेगळ्या वनगुन्हे प्रकरणी घोडेगाव न्यायालयाने आरोपीस शिक्षा म्हणून दंडात्मक कारवाई बरोबरच एक सामाजिक भान म्हणून एक वेगळीच शिक्षा सुनावताना वन्यप्राण्यांसाठी स्वखर्चाने वनक्षेत्रात पाणवठे तयार करण्याची शिक्षा सुनावली. घोडेगाव वनपरिमंडळ हद्दीत वणवा पेटविल्याबद्दल आरोपी दत्तात्रय मोर्हजी कोकणे (कोळवाडी, ता. आंबेगाव) व शिनोली परिमंडळ क्षेत्रात मोराची शिकार केल्याप्रकरणी आरोपी विजय सुनील गभाले (रा. गोहे खुर्द, ता. आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून वनकायद्याच्या तरतुदीनुसार निर्धारित दंडाची शिक्षा घोडेगाव न्यायालयाकडून सुनावण्यात आली व त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणून सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने आरोपींनी वन्यप्राण्यांसाठी स्वखर्चाने वनक्षेत्रात पानवठे तयार करावेत असे आदेश दिले व या आदेशाची अंमलबजावणी करत संबंधित आरोपींनी उगलेवाडी, शिनोली, ढाकाळे वनक्षेत्रात पाणवठे तयार केले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी दिली. याबाबत वनविभाग जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे, शिनोलीचे वनपरिमंडळ अधिकारी जी. डी. इथापे, घोडेगावचे वनपरिमंडळ अधिकारी टी. एन. कदम यांनी कार्यवाही केली.

Web Title: Punishment Forest Offenders Creating Water Forest Area Own Cost

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top