मास्क न वापरणाऱ्यांवर पुण्यातील 'या' भागात दंडात्मक कारवाई

police1.jpg
police1.jpg

कॅन्टोन्मेंट (पुणे) : कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयमार्फत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर शंकरशेठ रोड, सेव्हेन लव्ह्ज चौकात दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न वापरल्यामुळे 500 रुपयाचा दंड नागरिकांकडून आकारण्यात आला. व सोबत मोफत मास्क ही वाटप करण्यात आले.

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...
 
सोशल डिस्टंन्सिंग ठेवणे व मास्कचा वापर करणे या गोष्टींची सवय नागरिकांना सध्याच्या काळात तरी अतिशय महत्त्वाची आहे. या अनुषंगाने हा उपक्रम क्षेत्रीय कार्यालय मार्फत राबविला जात आहे. आज सुमारे  22 नागरिकांवर कारवाई करून 11000 रुपये  दंड वसूल करण्यात आला.  सदर कारवाई  सहाआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद, आरोग्य निरीक्षक निसार मुजावर,  संतोष कदम, मुकादम संतोष भूमकर, प्रदीप परदेशी, फिरोज कादरी, संजय कांबळे व दीपक ससाणे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com