पंजाबी मूर्तिकारांचा घातला लाखो रुपयांना गंडा

संतोष विंचू 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

येवला : महापुरुषांच्या देखण्या व सुंदर मुर्त्या बनवून देतो असे सांगून मुर्त्यांची ऑर्डर घेऊन व आगाऊ रक्कम घेऊन काही मूर्तिकार तीन महिन्यापासून परागंदा झाले आहेत. या पंजाबी मूर्तिकारांनी पूर्व भागातील अनेकांना लाखोंना गंडा घातला आहे. नागरिकांच्या मनात अढळ स्थान असलेले शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबडेकर आदी महापुरुषांच्या, देवदेवतांच्या मूर्ती बाजार मूल्यापेक्षा कमी भावात घरपोहच आणून देतो असे सांगून काही मूर्तिकारांनी नागरिकांमची मने जिंकले.

अंदरसूल, गारखेडा, देवळणे, बोकटे आदी गावातील प्रतिष्टीत व्यक्तींना या भामट्यांनी छापील जमापावती देत काहीकडून पाच हजार, दहा हजार अशी रक्कम मूर्तीसाठी आगावू घेत पोबारा केला आहे. भामट्यांनी अनेकांकडून लाखो रुपये गोळा करत सुमारे चार महिन्यांपासून वाट पहायला लावली आहे.

शीख धर्मियांच्या वेशातील दोघे तिघे गावात येवून एखाद्या व्यक्तीला मूर्ती बसवून देतात आणि सोबत फोटो काढतात. 1याच फोटोचे भांडवल करत इतरांना मूर्ती बनविण्याच्या मोहात टाकत आगाऊ रक्कम घेऊन बुकिंग करतात व काही दिवसात मूर्ती घरपोहोच आणून देतो असे विश्वासात घेवून सांगतात. तशी पावती देखील त्यांनी दिली असून यावर पंजाब येथील विविध गावांचे चुकीचे पत्ते व फोन क्रमांक आहेत. मूर्ती न आल्याने वाट पाहून थकल्याने अनेकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होत नसल्याने आता फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे. अशा फसवणूक करणाऱ्या भामट्या परप्रांतीय टोळीचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी फसवणूक झालेले नागरिक दबक्या आवाजात करीत आहे

“मला मोहात अडकवत भामट्यानी ११ एप्रिलला पैसे दिले. तीन महिने उलटून झाले अद्याप पावतो मला मूर्ती मिळाली नाही. तर पावतीवरील क्रमांक लागत नाही. यामुळे माझी व परिसरातील इतर नागरिकांची फसवणूक झाल्याचे सिद्ध होत आहे. या बद्द्ल लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहोत.”
- अप्पासाहेब खैरनार, गारखेडा

“तालुक्यात मूर्तिकारांकडून फसवणुकीचे प्रकार होत असेल तर गंभीर आहे.फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार द्यावी.”
-बाळासाहेब भापकर,पोलीस निरीक्षक,येवला तालुका

Web Title: The Punjabi sculptors cheated