...उन्हें जानने के लिये एक जनम है अधुरा !

birju maharaj
birju maharaj

पुणे - नृत्य आणि त्यात असणारी अस्फुट स्थिरता, खरंतर त्यांचं नृत्य म्हणजे जणू एक हलतं शिल्पच... एखादा पांढराशुभ्र कॅनव्हास हळूहळू निखरत जाण्याचा अनुभव देणारे आहेत आमचे गुरुजी... लखनौ घराने की नृत्य की खुशबू मतलब गुरुजी... उन्हें जानने के लिये एक जनम तो है अधुरा... अशा एकापेक्षा एक शब्दांत आपल्या गुरूच्या शैलीचे असंख्य पैलू शिष्य एकीकडे हळूवार उलगडत होते आणि दुसरीकडे स्थितप्रज्ञ व तृप्त मुद्रेने हे सारे पितृतुल्य गुरू अर्थात कथकगुरू पं. बिरजू महाराज हे मनोगत मन लावून ऐकत होते.

कलाछाया संस्थेत आयोजित "मला उमजलेले बिरजू महाराज' या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवारी (ता. 14) हा अपूर्व अनुभव उपस्थितांनी घेतला. बिरजू महाराजांविषयी विदुला कुडेकर, योगिनी गांधी, देवयानी चंद्रात्रे, जयश्री जंगम, तसेच रेणू सलुजा यांनी मनोगत व्यक्त केले. महाराजांच्या ज्येष्ठ शिष्या शाश्‍वती सेन आणि कलाछायाच्या संस्थापिका प्रभा मराठे या वेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर योगिनी चंद्रात्रे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
"गुरू की कहनी' आणि त्यावर आधारित "शिष्यों की सीख' याची सुरेख सांगड दर्शविणारा हा कार्यक्रम होता. काही शिष्यांनी नृत्याभिनयासह आपले मनोगत मांडले. एखाद्या रेशमी धाग्यासारखे अन्‌ "हृदयाशी हृदयाला जोडणारे' असे महाराजांचे नृत्य असते...त्यातील सौंदर्य हे शब्दांत सांगणे अपूर्णच ठरेल, अशा भावना या वेळी व्यक्त झाल्या. अनेकांनी आपल्याला बालपणी झालेल्या महाराजांच्या शैलीच्या साक्षात्कारामुळेच आपण नृत्यक्षेत्रात आजवर वाटचाल करू शकलो, असेही आवर्जून नमूद केले.

निसर्गातल्या प्रत्येक तत्वाकडून मी स्वतः नेहमी काहीतरी शिकत असतो. त्यात एक आपसूक कला दडलेली असतेच. नृत्य असो वा चित्रकला... किंवा कविता लेखन, या प्रत्येकातून व्यक्त होणं हे एकसारखाच आनंद देणारं असतं. हे तर असतात मनाचे विविध रंग! कलेची साधना करणं महत्त्वाचं, तुम्ही त्या आनंदात आपोआप प्रवाहित होत जाता.
- पं. बिरजू महाराज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com