पुरंदर विमानतळासाठी दोन स्वतंत्र आराखडे

Airport
Airport

पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आणि त्यालगतच्या सुमारे ८०० हेक्‍टर जागा, असे दोन स्वतंत्र विकास आराखडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी विमानतळाचा आराखडा डार्स कंपनीकडून, तर विमानतळ सोडून उर्वरित ८०० हेक्‍टर जागेचा आराखडा लि असोसिएट ही कंपनी तयार करणार आहे. 

पुरंदर येथील विमानतळासाठी सुमारे २ हजार ८३२ हेक्‍टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार दिले आहेत. दोन हजार हेक्‍टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे.

डार्स कंपनीला विमानतळाचा मास्टर प्लॉन तयार करण्याचे काम दिले आहे. तर उर्वरित ८३२ हेक्‍टर जागेवर विमानतळासाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यास राज्य सरकारने पूर्वीच मंजुरी दिली होती.

त्यानुसार निविदा काढून हे काम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लि असोसिएट या कंपनीला दिले आहे. त्यांना सहा महिन्यांत आराखड्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

काकाणी म्हणाले,‘ प्रत्यक्षात विमानतळासाठी दोन हजार हेक्‍टर जागा लागणार आहे. त्यांचा मास्टर प्लॅन डार्स ही कंपनी तयार करणार आहे.

लवकरच तो मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विमानतळालगतच्या उर्वरित ८०० एकर जागेचे संपादन कंपनीकडून करण्यात येणार नाही; परंतु त्यांचा विकास आराखडा कंपनीकडून तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ली असोसिएट या कंपनीची नियुक्ती केली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com