मुख्यमंत्री सड़क योजनेतून पुरंदर व हवेली तालुक्यात 50 कि.मी.चे रस्ते

सासवड व जेजुरी नगरपालिका हद्दीत विविध विकास कामांसाठी सहा कोटी
आ. संजय जगताप
आ. संजय जगतापsakal

सासवड : मुख्यमंत्री सड़क योजनेतून पुरंदर व हवेली तालुक्यात 50 कि.मी. चे रस्ते व पाणंद रस्ते 50 कि.मी. चे आणि त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 43 कोटी 96 लाख रुपयांची विविध बांधकाम तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करुन घेण्यात यश मिळाले. तसेच सासवड व जेजुरी नगरपालिका हद्दीत विविध विकास कामांसाठी सहा कोटी व कऱहा नदीवरील पुलासाठी 8 कोटी रुपयांची तरतूद झाल्याचे आमदार संजय जगताप यांनी येथे पत्रकार परीषदेत सांगितले.

सासवड नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परीषदेस बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप, माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, नगरसेवक अजित जगताप, गणेश जगताप, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. झेंडेवाडी ते पांडेश्वर रस्त्यासाठी 27 कोटी रुपयांची पुरवणी मागणीवर तत्वतः मान्यता मिळाली. दिवे पंचक्रोषी भागात रिंगरोडसाठी तरतूद झाली आहे. शेततळे अस्थरीकरण (प्लॅस्टीक कागद) साठी तळेनिहाय 75 हजारांची व नियमित पिककर्जदार शेतकऱयांना 50 हजारांचे अनुदान देण्याची मागणीही शासनाने मान्य केल्याचे आ. जगताप म्हणाले.

दिवे येथील आरटीअो कार्यालयामार्फत दिवसाला 2 हजार परवाने वितरीत होतात, तिथली क्षमता 5 हजारांपर्यंत वाढेल. शिवाय आरटीअोलगतच 27 एकरमध्ये प्रशिक्षण केंद्र करण्याचा व अॅटो हब स्वरुप देण्याचा निर्णय झाला आहे. दिवे क्रिडासंकुलातील 400 मीटरचा ट्रॅक वापर सुरु झाला असून अजून 10 कोटींची क्रिडांगणासाठी तरतूद केली आहे. विमानतळाच्या प्रश्नावर आमदार जगताप म्हणाले., फेब्रुवारी 2024 पर्यंत पुरंदर तालुक्यातील नियोजित विमानतळावरुन विमाने उड्डाण करताना दिसतील. त्याची चिंता करु नये.

टिका करणारांनीही नारळ फोडायला यावे : आ. जगतापांचा शिवतारेंना चिमटा

सासवडला संगमेश्वर ते संत सोपानदेव समाधीपर्यंत नदीकाठी विविध पर्यटनार्थ विकास कामे सुरु करण्यासाठी स्वतः पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यावेळी नुस्ती टिका करीत बसण्यापेक्षा महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनीही नारळ फोडायला यावे., माझे निमंत्रण राहील.. असे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता चिमटा काढला. गुंजवणी प्रकल्पावर तुम्ही काहीच बोलत नाही., असे म्हणताच आ. जगताप यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची क्लिप सादर करुन गुंजवणीसाठी दोनवेळा पंपिंग करण्यापेक्षा सोमुर्डीला पाणी आणण्याचा बदल सुचविल्याचा पाटील यांच्या भाषणाचा पुरावाच दिला. पुरंदर उपसा योजनेतील उर्वरीत लाभक्षेत्रासाठीचाही प्रश्न मांडल्याचे ते म्हणाले. }

सीताफळ इस्टेट व कृषी महाविद्यालय मार्गी लागणार : आ. जगताप

संत्र्याच्या धर्तीवर दिवे (जाधववाडी) येथील अंजीर - सीताफळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर 50 एकर क्षेत्रात सीताफळ इस्टेटची मागणी केली आहे. तिथे सीताफळ - अंजीर रोपवाटिकेपासून ते प्रक्रीया, पॅकींग, मार्केटींगपर्यंचे सर्व कामकाज होऊन.. तालुक्यातील शेतकऱयांना त्याचा लाभ होईल. शिवाय राहुरी कृषी विद्यापीठाशी सलग्न शासकीय कृषी महाविद्यालय पुरंदर तालुक्यात करण्याच्या मागणीला शासन लवकरच हिरवा कंदील दाखवेल., असेही आमदार संजय जगताप म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com