पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पप्पुशेठ भोंगळे

श्रीकृष्ण नेवसे
शुक्रवार, 25 मे 2018

सासवड (पुणे) : येथील युवक नेते वृषाल रविंद्र उर्फ पप्पुशेठ भोंगळे यांची पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी आज भोंगळे यांची नियुक्ती पत्राद्वारे केली.

बारामतीनजिक 'गोविंदबाग' येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते भोंगळे यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे, माणिक झेंडे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले आदी उपस्थित होते. तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन अध्यक्ष पप्पुशेठ भोंगळे (वय 28) हे युवकांच्या विविध उपक्रम, कार्यक्रमात अग्रभागी असतात.

सासवडचे ते रहिवासी असल्याने आणि शेती व लॅन्ड डेव्हलपर्स व्यावसायिक असल्याने त्यांचा चांगलाच संपर्क आहे. त्यातूनच काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर आज भोंगळे यांना नियुक्तीपत्रही स्वाधीन केले. यानिमित्त पक्षाध्यक्ष शरद पवार यांचेही त्यांनी समक्ष भेटीत आशिर्वाद घेतले. यानिमित्ताने भोंगळे यांनी प्रतिक्रीयेत सांगितले की; गाव - वस्ती तिथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसची क्रियाशील शाखा उघडली जाईल. पक्षीय संघटना निवडणुकीपूर्वीच मजबूत केली जाईल. युवकांना सारी ताकत दिली जाईल. निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमधून व युवकांमधून पप्पुशेठ यांचे अभिनंदन होत आहे. 

Web Title: purandar tehsil youth rashtravadi chief pappusheth bhongale