विमानतळासाठी १५ दिवसांनंतर जागानिश्‍चिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे - पुरंदर विमानतळासाठी राज्य सरकारने २८३२ हेक्‍टर जागा निश्‍चित केली असली, तरी विमानतळासाठी प्रत्यक्षात किती जागा लागणार, या बाबतची माहिती डार्स या सल्लागार कंपनीकडून मागविण्यात आली आहे. पंधरा दिवसांत कंपनीकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर विमानतळासाठीची जागा निश्‍चित करण्यात येणार आहे. दरम्यान, उर्वरित जागेवर बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे.

विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस विशेष नियोजन समिती म्हणून २८३२ हेक्‍टर जागा ताब्यात घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या कंपनीने विमानतळाचा तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्य अहवाल तयार करण्याचे काम जर्मनमधील डार्स कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून त्या संदर्भातील अहवाल सप्टेंबर महिन्यात प्राप्त होणार आहे. 

बांधकाम नियमावली तयार करताना शिर्डी, नागपूर येथील विमानतळाच्या परिसरासाठी तयार करण्यात आलेल्या बांधकाम नियमावलीचा आधार घेण्यात आला आहे. तसेच विमानतळापर्यंत येण्यासाठी मेट्रोसह अन्य वाहतूक व्यवस्थेचा विचार केला जाणार आहे.

विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या धावपट्टी, पार्किंग बे, टर्मिनल, कार्गो हब अशा कामांसाठी प्रत्यक्षात किती जागा लागणार आहे, याचा अहवाल डार्स कंपनी तयार करीत आहे. त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर तेवढी जागा संपादित करण्यात येणार आहे. 
-सुरेश काकाणी,  उपाध्यक्ष महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी
 
  • राज्य सरकारकडून विमानतळासाठी २८३२ हेक्‍टर जागा मंजूर
  • प्रत्यक्षात विमानतळासाठी लागणारी जागा १८०० ते २२०० हेक्‍टर
  • मंजूर जागेपैकी कोणती जागा विमानतळासाठी आवश्‍यक, त्याचा सल्ला डार्स कंपनीकडून घेणार
  • विमानतळाची जागा सोडून उर्वरित जागेसाठीची बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम सुरू
Web Title: Purander airport confirmed 15 days