तब्बल पावणेआठ लाखांची पर्स लंपास

संदीप घिसे 
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) : पर्स बाकड्यावर ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेलेल्या एका महिलेची 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पावणे आठ लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना कासारवाडीतील गंधर्व गरिमा लॉन्स येथे बुधवारी रात्री घडली.

रामचंद्र गणपतराव झरकर (वय 59, रा. सदाशिव पेठ, लक्ष्मी निवास अपार्टमेंट, पुणे) यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र झरकर हे आपल्या पत्नीसह एका कार्यक्रमासाठी आले होते. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नीला फोटो काढण्यासाठी स्टेजवर बोलवले. यामुळे त्यांच्या पत्नीने पर्स बाकड्यावर ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. त्यावेळी चोरट्याने बाकड्यावर ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्समध्ये 7 लाख 77 हजारांचे दागिने आणि तीन मोबाइल होते. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुनील गाडे करीत आहेत.

Web Title: Purse snatched by theft of carrying rupees 7 lakhs 77 thousand

टॅग्स