सिध्देश्वर निंबोडीला खोमणे यांचे श्रमदान आणि इंधन खर्चासाठी आर्थिक मदत

संतोष आटोळे
गुरुवार, 17 मे 2018

शिर्सुफळ : सिध्देश्वर (ता.बारामती) येथील पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामस्थांसह बारामती औद्योगिक वसाहतीतील श्री अर्थमूव्हर्सच्या पुरुषोत्तम खोमणे यांनी श्रमदानात सक्रिय सहभाग घेत ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी आतापर्यत जलसंधारण कामाच्या इंधन खर्चासाठी स्वत: एक लाख पंचवीस हजार रुपयांहून अधिकचा निधी दिला आणि यापुढे 22 मेपर्यत लागणारे इंधन देणार असल्याचे सांगितले.  

गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला सुरवातीपासून विविध जलसंधारणाच्या कामात आघाडी घेतली. यामध्ये श्रमदानातून सलग समतल चर, बांध बंदिस्ती, मातीनाले, ओढा खोलीकरण, तलावातील गाळ काढणे यांच्यासह श्रमदानासह कठीण ठिकाणीची कामे पोकलेन व जेसीबी मशिनद्वारे केली जात आहेत. याकामांना प्रोत्साहन मिळावे यासाठी समाजातील अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढाकार घेत आहेत.

यामध्ये पुरुषोत्तम खोमणे यांनीही आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून श्रमदानात सहभाग घेतला. त्याबरोबरच जलसंधारणाच्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनसाठी लागणारा इंधन खर्च देत आहेत. यामधून त्यांनी आतापर्यत 1 लाख 16 हजार रुपयांचे इंधन दिले आहे. 

तसेच स्पर्धा संपेपर्यत म्हणजे 22 मेपर्यत इंधन खर्च देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल श्रमदानानंतर झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मेडिकोज गिल्डचे पदाधिकारी, सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, ग्रामसेविका रंजना आघाव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: purshottam Khomane works and gives financial help