पुरुषोत्तमचे वारे सुटले..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

एरंडवणा - तू पॉजेस वर्कआउट कर! लाइट प्लॅन तयार झाला का? म्युझिक कुठपर्यंत आलंय? पावसाळा सुरू झाला की पुण्यात साधारण सगळ्या महाविद्यालयांमध्ये हे संवाद ऐकू येतात. पुरुषोत्तमने पन्नाशी ओलांडली, कलाकारांच्या पिढ्या बदलल्या; परंतु विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि ऊर्मी अजूनही तशीच आहे.

आता लॉट्‌स जवळ आले आहेत. नाटक बऱ्यापैकी बसत आलंय. पुरुषोत्तम करणाऱ्या प्रत्येकाला आता हेच टेन्शन आहे. अजूनही पुरुषोत्तमची ऊर्जा वर्षभर पुरते. पुरुषोत्तमचे स्वरूप बदलले, नियम आणखी कडक झाले. त्याच ताकदीने नाटकं सादर करण्याचे आव्हानही वाढले. एकीकडे यू ट्यूबवर वेबसीरिजसारखं मोठं व्यासपीठ तयार होतंय. इंटरनेटमुळे झालेल्या बदलांमुळे अभिनयाचं आणि सादरीकरणाचं स्वरूप बदललं. व्यक्त होणं सोपं होऊन जग आणखी जवळ यायला लागलंय; पण मिळेल त्या जागेत प्रॅक्‍टिस करणं, कमी बजेटमध्ये सगळा सेट उभा करणं यातली मजा फक्त पुरुषोत्तम करणाऱ्यालाच माहिती असते. मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालयाच्या आर्ट सर्कलची तयारीही जोरदार चालू झालीये.

 ‘‘पुरुषोत्तममध्ये नाटक करताना जो जिवंतपणा असतो, तो वेबसीरिजमधून कधीच मिळत नाही. बदलत्या काळानुसार नाटक बसवण्याच्या, नाटकाला पूरक असणाऱ्या गोष्टींमध्ये बदल नक्कीच झाला आहे. नाटकाची पारंपरिक चौकट मात्र आहे तशीच आहे,’’ असे विद्यार्थी प्रतिनिधी मुकुल ढेकळे याने सांगितले. 

सोशल मीडियामुळे स्रोत वाढले; वेळ वाचायला लागला. एखाद्या पात्राचा यू ट्यूबवर अभ्यास करणं, वेगवेगळ्या ॲप्स किंवा सॉफ्टवेअरमधून म्युझिकसाठी ट्रॅक्‍स तयार करणं. या गोष्टींची नक्कीच मदत झाली; पण अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन याचं महत्त्वही कमी झालेलं नाही, असंही त्यानं सांगितलं.

Web Title: Purushottam Karandak in pune