अडीच लाखांची लाच घेताना पीडब्ल्यूडीचा अभियंता जाळ्यात

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर 50 लाख रुपयांचे बिल मंजुरीला पाठविण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) कार्यरत असलेल्या शाखा अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. विलास तांभाळे (वय 57) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून त्याठिकाणी तांभाळे हे  शाखा अभियंता म्हनुन कार्यरत आहे. तक्रारदारराने पुणे जिल्ह्यातील रस्त्याचे कंत्राट मिळाले होते. काम पूर्ण केल्यानंतर 50 लाख रुपयांचे बिल सही करून मंजुरीसाठी पाठविण्यासाठी तांभाळे यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानुसार गुरुवारी (ता.4) एसीबीने सापळा रचला व दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास तांभाळे यांना तक्रारदाराकडून अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.  त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात खळबळ उडाली. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com