अल कायदाचा म्होरक्‍या कासिम रिमीचा खातमा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

  • अमेरिकेच्या कारवाईत ठार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन : दहशतवादविरोधी मोहिमेत अमेरिकेला पुन्हा एकदा मोठे यश मिळाला आहे. येमेनमध्ये अमेरिकेच्या सैन्याने अराबियन द्वीपकल्पात अल कायदा (अल कायदा इन अराबियन पेनिन्सुला- एक्‍यूएपी) या दहशतवादी संघटनेची स्थापना करणारा कासीम अल रिमी याला ठार केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (ता. 6) केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतीच्या नौदलाच्या तळावर झालेल्या सामूहिक गोळीबार करण्याची जबाबदारी "एक्‍यूएपी'ने स्वीकारली होती. अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी याच्यानंतर संघटनेत दुसऱ्या क्रमांकावर रिमी (वय 46) होता. अल कायदाच्या येमेनमधील संघटनेची जबाबदारी 2015 मध्ये रिमीने स्वीकारली होती. तेव्हापासून तो अमेरिकेला हवा होता. त्याची माहिती देण्यासाठी अमेरिकेच्या सरकारने एक कोटी डॉलर बक्षीस जाहीर केले होते.

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

"रिमी याच्या मृत्यूने अल कायदाचे अराबियन द्वीपकल्पातील आणि एकूणच जगातील वर्चस्वाला मोठा हादरा बसला आहे. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोचविणाऱ्या अशा दहशतवादी संघटना नेस्तनाबूत करण्यास आपल्याला फार काळ लागणार नाही. अमेरिकेची दहशतवादविरोधी मोहीम याच दिशेने सुरू आहे,'' असे ट्रम्प म्हणाले. रिमी याने 1990मध्ये अल कायदाच्या संपर्कात आला होता. अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनसाठी तो काम करीत होता. त्याच्या नेतृत्वाखाली " एक्‍यूएपी'ने येमेनमधील जनतेवर बेसुमार अत्याचार करण्याचा विडा उचलला होता. तसेच अमेरिका आणि तिच्या सैन्यदलांवर अनेक हल्ले करण्याचे डाव त्यांची रचला होता. आता त्याच्या मृत्यूने अमेरिका, आपले हित आणि आपले सहयोगी सुरक्षित आहेत, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने रिमीला ठार मारल्याच्या वृत्ताला दुजोरा ट्रम्प यांनी दिला तरी अमेरिकेने ही कारवाई कधी व कशी केली, याबद्दल अधिक माहिती त्यांनी दिली नाही.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

हल्लेखोराचा सन्मान
फ्लोरिडामधील पेन्साकोला येथील अमेरिकेच्या हवाई दल तळावर 6 डिसेंबर रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यात सौदी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याचा आणि अमेरिकेच्या तीन खलाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर रिमीने प्रसारित केलेल्या 18 मिनिटांच्या व्हिडिओत या हल्ल्याची जबाबदारी "एक्‍यूएपी'ने स्वीकारल्याचे जाहीर केले होते. हल्लेखोर मोहम्मद अल्शमरानी याचा त्याने "शूर सरदार' आणि "नायक' अशा शब्दांत सन्मान केला होता, असे वृत्त त्या वेळी प्रसारमाध्यमांनी दिले होते.

अमेरिकेला नुकसान पोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाळत ठेवून त्यांचा खातमा करू. - डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Qassim al Rimi US forces killed al Qaida leader in Yemen Trump confirms