‘क्‍यूआर कोड’चे न सुटलेले कोडे

QR-Code
QR-Code

पुणे - पाठ्यपुस्तके तंत्रस्नेही करण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा गाजावाजा करत ‘क्‍यूआर कोड’चा घाट घातला. हा कोड मोबाईलमध्ये स्कॅन करताच पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम तुमच्या मोबाईलवर असेल, असा दावाही केला; परंतु अद्यापही काही पाठ्यपुस्तकांचा क्‍यूआर कोड स्कॅन करूनही त्यातील धडे आणि संदर्भ मोबाईलवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अर्धे शैक्षणिक वर्ष सरत असतानाही पाठ्यपुस्तकातील ‘क्‍यूआर कोड’चे कोडे अद्याप सुटले नसल्याने विद्यार्थी, शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) पाठ्यपुस्तकांवर ‘क्‍यूआर कोड’ छापला आहे. पाठ्यपुस्तकात छापलेला ‘क्‍यूआर कोड’ मोबाईलवर स्कॅन केल्यास संपूर्ण पाठ्यपुस्तक पीडीएफ स्वरूपात किंवा संबंधित धडा, कविता, गणित, प्रयोग यासंदर्भातील शैक्षणिक साहित्य मोबाईलवर उपलब्ध होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अधिक मदत होते. शिक्षण तंत्रस्नेही व्हावे, असा यामागील उद्देश आहे. गेल्या काही वर्षांपासून नव्याने छापण्यात येणारी; तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा क्‍यूआर कोड वापरून हा प्रयत्न सुरू आहे; परंतु अद्यापही मराठी, इंग्रजी, भूगोल अशा काही विषयांतील पाठ्यपुस्तकांत ही सुविधा कार्यान्वित नसल्याचे दिसून येत आहे.

‘‘पाठ्यपुस्तकांतील प्रत्येक धड्याच्या शेवटी दिलेला ‘क्‍यूआर कोड’ मोबाईलवर स्कॅन केला असता, संदर्भ उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते,’’ असा अनुभव असल्याचे काही शिक्षकांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.

पाठ्यपुस्तकांमधील ‘क्‍यूआर कोड’ स्कॅन करून धडे मोबाईलवर उपलब्ध होण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यात संबंधित विषय व त्याचे धडे याप्रमाणे माहिती लिंक करण्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.
- डॉ. सुनील मगर, संचालक, बालभारती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com