आर्थिक दुर्बलांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा  - उपमहापौर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना महापालिकेतर्फे दर्जेदार आणि माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी रिपब्लिकन पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. तसेच, ससूनच्या धर्तीवर शहराच्या चारही दिशांना महापालिकेची सक्षम रुग्णालये व्हावीत, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शहराचे नवनिर्वाचित उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, झोपडपट्टीतील नागरिकांना किमान 500 चौरस फुटांची घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यावर कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "सकाळ'ला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र 

कांबळे, महापालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, तसेच बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, महिपाल वाघमारे आदी उपस्थित होते. महापालिकेच्या नव्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) पाच सदस्य आहेत. या पार्श्‍वभूमीवर कांबळे यांनी पक्षाची आगामी काळातील वाटचाल स्पष्ट केली. "सकाळ'तर्फे होणाऱ्या उपक्रमांतही पक्ष ताकदीने सहभागी होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

ते म्हणाले, ""आर्थिक दुर्बलांसाठी आरोग्य, शिक्षण आणि घरे याला पक्षाचे प्राधान्य असेल. महापालिकेच्या दवाखान्यांचे, शाळांचे खासगीकरण करू नये, अशी पक्षाची भूमिका आहे. तसेच, वस्ती विभागात समाजमंदिरे उभारण्याऐवजी आधुनिक आणि दर्जेदार सुसज्ज अभ्यासिका, ग्रंथालये उभारण्यात यावीत, यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पुरेशी वसतिगृहे उभारण्यावरही भर असेल.'' 

झोपडपट्टीतील नागरिकांना "एसआरए'च्या माध्यमातून पाचशे चौरस फुटांचे घर देण्यासाठी पक्ष आगामीकाळात प्रयत्नशील असेल, त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नियमावलीत (एसआरए) सुधारणा व्हावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, त्यांच्यासह पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे संबंध चांगले आहेत, त्यांनी पक्षाला सन्मानाचे स्थान दिले आहे, त्यासाठी पक्षाच्या वतीने पालकमंत्री बापट यांचे आभार मानतो, अशीही भावना कांबळे यांनी व्यक्त केली. 

Web Title: Quality health care for the weak economic