गुणवत्तेसाठी प्राध्यापकांचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने उपक्रमशील शिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. पुणे शहरातून ११, तर नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १३ प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘टीचर्स लर्निंग सेंटर’ सुरू झाले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांसाठी विविध कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. तसेच, देशभरातूनही प्राध्यापक या कार्यशाळेमध्ये सहभागी होत आहेत. 

‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील प्राध्यापकांसाठी विविध विषयांना अनुसरून प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. केंद्र शासनाच्या विशेष तरतुदीमुळे सध्या विनामोबदला हे प्रशिक्षण दिले जात आहे. या कार्यशाळेत झालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे प्राध्यापकांनी कालबद्ध कार्यक्रम आखणे आणि इतर सहकारी प्राध्यापकांना प्रशिक्षित करणे अपेक्षित असल्याचे टीचर्स लर्निंग विभागाच्या संचालक प्रा. दीपाली मालखेडे यांनी सांगितले. 

दिल्ली विद्यापीठाचे डॉ. यशवंत मुद्गिल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. सुजाता भार्गव आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळातील डॉ. चेतन गाडगीळ, वनस्पतिशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. नूतन मालपाठक आदी या वेळी उपस्थित होते.

शिक्षण पद्धतीमध्ये गुणवत्ता सुधार कार्यक्रम हाती घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पंडित मदन मोहन मालवीय राष्ट्रीय मिशनअंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
- डॉ. अंजली कुलकर्णी, सहायक प्राध्यापक, वनस्पतिशास्त्र विभाग

Web Title: quality professor training