आंद्रा धरण प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे प्रश्न लवकरच मार्गी

pune
pune

टाकवे बुद्रुक - आंद्रा धरणप्रकल्पामुळे वीस वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या आंदर मावळातील शिरे व शेटेवाडीचे लवकरच पुनर्वसन होणार आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने या अनुषंगाने मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. येत्या दोन महिन्यात सबंधित शेतक-यांना आंबी जवळ पुनर्वसनाचे प्लॉट उपलब्द होतील अशी माहिती आमदार भेगडे यांनी दिली. 

१९९७ मध्ये शासनाने तळेगाव औद्योगिक वसाहत व पिंपरी चिंचवड सह आळंदी, देहू तीर्थस्थळाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून मंगरूळ धरण बांधले.या धरणामुळे शिरे, शेटेवाडी, आंबळे, निगडे, कल्हाट, पवळेवाडी, फळणे,टाकवे बुद्रक,फळणेतील शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या,या धरणात सर्वाधिक जमिनी शिरे शेटेवाडीतील शेतक-यांच्या संपादित झाल्या,शिवाय घरे,पिकाच्या जमिनी ,जनावरांचे गोठे संपादित झाले. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करावे या मागणीने जोर धरला.

प्रशासकीय पातळीवरही वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसवाचे आश्वासन दिले पण लालफितीतील कागद पुढे काही सरकत नव्हता,सरतेशेवटी प्रशासनाने या गावांच्या पुनर्वसनासाठी आंबी जवळ संपादित केलेल्या जमिनीवर प्लॉट देण्याची प्रकिया सुरू केली.पण शेतकरी आणि शासन यांच्या मूल्यांकना बाबत एकमत होत नव्हते.या बैठकीत यावर तोडगा काढून १९७२च्या पुनर्वसनाच्या आदेशा नुसार २००५च्या मूल्यांकनानुसार हे वाटप केले जाणार आहे. गायरानातील ११एकर १५गुंठे जमिनीवर होणा-या पुनर्वसनात नजीकच्या काळात सर्व सुविधा उपलब्द करण्यावर शिक्चामोर्तब झाले. या आठवडयातच या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. सध्या या दोन्ही गावातील बहुतेक प्रकल्पग्रस्त टाकवे बुद्रुक, तळेगाव, वराळे, कामशेत परिसरात राहत आहे.तब्बल वीस वर्षानंतर गावकरी एकत्रित राहताना दिसतील.संपादित केलेल्या जमिनींना वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतक-यांनी न्यायालयात धाव घेतली आहे,शासन शेतकरी व न्यायालयाच्या अधीन राहून योग्य वाढीव मोबदल्यासाठी योग्य तो तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेईल अशी माहिती भेगडे यांनी दिली. संपादित क्षेत्रावर धरणाचा पाणीसाठा वगळून राहिलेल्या जमिनीवर पडलेल्या संपादनाचा शेरा काढून मूळ शेतक-यांना या जमिनी कसण्यासाठी द्यावी या बाबतही चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com