वाघोलीतील कचऱ्याचा प्रश्न मार्गी

निलेश कांकरिया
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

वाघोली - वाघोलीतील सध्याच्या कचरा डेपोतच कचरा टाकण्यासाठी जागा करण्यात आली. त्यामुळे घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती उपसरपंच संदीप सातव व ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी दिली. 

महिनाभरा पासून कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कचरा प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने कचरा डेपोत कचरा टाकण्यासाठी जागाच नव्हती. या मुळे घंटा गाड्या ही बंद करण्यात आल्या होत्या. तसेच कंटेनर ओसंडून वाहत होते. तो कचरा ही उचलला जात नव्हता. घरी आणि दारी सर्वत्र कचरा अशी परिस्तिथी होती. या समस्या बाबत नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ग्रामसभेही अभूतपूर्व गोंधळ झाला होता. मागील दोन दिवसापासून कचरा डेपो परिसरात कचऱ्याचे ढीग हलवून जागा मोकळी करण्याचे काम सुरू होते. जागा उपलबध झाल्याने घंटा गाड्या सूरु करण्यात आल्या आहेत. भाडेतत्वावर बसविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. 

Web Title: The question garbage in wagholi solved