पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

अटक आरोपींनी देशाच्या विरोधात मोठा कट  केल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे. त्याची व्याप्ती पुन्हा नवीन पद्धतीने तपासली जाऊ शकते.

पुणे : एल्गार परिषद आणि त्यानंतर झालेल्या भीमा-कोरेगाव दंगलीनंतर माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सर्व 9 आरोपींच्या विरोधातील तपास पूर्ण झालेला आहे. असे असताना या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्यानंतर आता कोणत्या नवीन बाबी समोर येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोठी बातमी - या रविवारी रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईकरांना दिलासा

या प्रकरणाचा तपास आम्ही पुढे चालू ठेऊ अशी कोणतीही तरतूद तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी ठेवलेली नाही. त्यामुळे एनआयएचे तपास अधिकारी आरोपींचा काय व कश्या पध्दतीने तपास करणार याबाबत अद्याप तरी काही स्पष्ट झालेले नाही. एनआयएकडे तपास गेल्याने पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला का? तपासात काही त्रुटी राहिल्या का? जप्त झालेल्या मुद्देमालाचे योग्य प्रकारे विश्लेषण करण्यात आले का? आदी बाबींची तपासणी होऊ शकते. 

मोठी बातमी -  अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या

राज्य शासनाची परवानगी न घेता केंद्र सरकार कोणत्याही प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपे शकते. मात्र आधीच्या तपास यंत्रणेने केलेला तपास नंतरच्या तपास यंत्रणेने खोडून काढण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम नव्हते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचे उत्तर या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रात मिळू शकते. पोलिसांनी अगदी देशपातळीवर तपास केल्याचे आढळून येते. तपासात काय बाकी आहे याचा विचार करून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसचे पुन्हा विश्लेषण करून घेतले जाऊ शकते.

अटक आरोपींनी देशाच्या विरोधात मोठा कट  केल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे. त्याची व्याप्ती पुन्हा नवीन पद्धतीने तपासली जाऊ शकते, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी दिली.

जप्त मुद्देमाल ठरणार एनआयएसाठी महत्त्वाचा : 
हे प्रकरण घडून सध्या दोन वर्ष उलटली आहेत.
तसेच पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र आणि त्यानंतर पुरवणी दोषारोपपत्र देखील सादर केली आहेत. आरोपींकडून तप्त केलेल्या मुद्दे मालाच्या आधारावर त्यांच्या विरोधात पुरावे असल्याचे न्यायालयात वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या पुढील तपास करताना हा जप्त मुद्देमाल एनआयएसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मोठी बातमी - पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम..

पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहेत. गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने झाला असून प्रकरण आता आरोप निश्चिती करण्यापर्यंत पोहोचले आहे. क्लोन कॉपीबाबत असलेला मुद्दादेखील निकाली निघाला आहे. मात्र केंद्र सरकारकडे अधिकार आहेत की ते तपास एनआयएकडे देऊ शकतात.- ऍड. उज्जला पवार, जिल्हा सरकारी वकील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question mark will appear on Pune police investigation?