ग्रामीण पोलिस दलातून राधा, राणी निवृत्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीत मागील दहा वर्षांच्या कालावधीत अनेक गुंतागुतींच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या श्‍वान भगिनी पोलिसांच्या सेवेतून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. राणी व राधा अशी या लॅबरोडार जातीच्या श्वानांची नावे आहेत. 

राणीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (एलसीबी), तर राधा हिने बॉम्बशोधक व बॉम्बनाशक (बीडीडीएस) पथकात वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून आत्तापर्यंत तब्बल दहा वर्षे सेवा केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका खास कार्यक्रमात दोघींना सन्मानपूर्वक निवृती देण्यात आली.

लॅबरोडार जातीच्या व वयाने दोन महिने असलेल्या राणीने जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत दहा वर्षांपूर्वी प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांतच राणीची बहीण राधाने बॉम्बशोधक व बॉम्बनाशक (बीडीडीएस) पथकात प्रवेश केला. दोघींनाही नऊ महिन्यांचे खडतर व शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर दोघी पोलिस दलात दाखल झाल्या.

श्‍वान भगिनींची कामगिरी 
राणी हिने शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील ऊसतोड महिलेचा खून, आव्हाटवाडी (ता. खेड) येथील खून प्रकरण, भांबुर्डे (ता. बारामती) येथील चिंकारा शिकार प्रकरण, रांजणगाव (ता. शिरूर) येथील महिलेचे खून प्रकरण, शिरूर शहरातील स्टेट बॅंकेवरील दरोडा, दौंड तालुक्‍यातील दरोड्यातील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणे, जेजुरी व भिगवण येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरण, अशा अनेक प्रमुख गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राधा हिनेही बॉम्बशोधक व बॉम्बनाशक (बीडीडीएस) पथकात काम करून, पोलिसांना साह्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. दरम्यान, राधा हिने पाच वेळा कोल्हापूर परिक्षेत्र कर्तव्य मेळाव्यात सहभाग घेऊन दोन सुवर्ण दोन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात तीन वेळा सहभाग घेतला आहे. 

राणीची कामगिरी मोठी आहे. त्यातील दोन गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलींना न्याय देऊ शकलो, याचे समाधान आहे. जेजुरी येथील अल्पवयीन मुलीवर एकाने बलात्कार करून खून केल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. यात संबंधित मुलीच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या ब्लेडच्या वासावरून राणीने संबंधित आरोपीला पकडून दिली. दुसऱ्या एका घटनेत तक्रारवाडीतील अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोत्यात आढळला होता. त्यात राणीने पोत्याच्या वासावरून आरोपींचे घर दाखवले होते. या गुन्ह्यातील आरोपींना नंतर शिक्षा ठोठावण्यात आली होती.
- गणेश फापाळे, हॅन्डलर  

Web Title: Radha & Rani retired from rural police force