राहुल, रोहनकडे मदतीचा ओघ; आमदार बेनकेंकडून पालकत्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पिंपरवाडी (ता. जुन्नर) येथील राहुल व रोहन डामसे यांचे पदवीपर्यंतचे शैक्षणिक पालकत्व आमदार अतुल बेनके यांनी स्वीकारले असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. डामसे कुटुंबास एक वर्षासाठी लागणारे धान्य व किराणादेखील बेनके यांच्याकडून दिला जाणार आहे.

जुन्नर - पिंपरवाडी (ता. जुन्नर) येथील राहुल व रोहन डामसे यांचे पदवीपर्यंतचे शैक्षणिक पालकत्व आमदार अतुल बेनके यांनी स्वीकारले असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. डामसे कुटुंबास एक वर्षासाठी लागणारे धान्य व किराणादेखील बेनके यांच्याकडून दिला जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आईची मृत्यूशी झुंज सुरू असतानाच एका अपघातात त्यांचे पितृछत्रदेखील हरपले असल्याने समाजाकडून आर्थिक मदतीच्या आधाराची गरज असल्याचे ‘सकाळ’ने केलेले आवाहन तसेच माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी सोशल मीडियावर मदतीसाठी दिलेली हाक, यास समाजाकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी फोनवरून आर्थिक मदत केल्याचे तसेच कोणती मदत अपेक्षित असल्याची विचारणा होत आहे. बुधवारी दोन लाख रुपये जमा झाले असून, आत्तापर्यंत एकूण तेरा लाख ६० हजार रुपये जमा झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul and Rohan get help from MLA Bennke parenting