'त्यांना तर आजीचा इतिहास माहीत नाही'; शरद पोंक्षेंचा राहुल गांधींना टोला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

‘‘ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार?’’ अशा शब्दांत अभिनेता शरद पोंक्षे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, ‘केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे आतातरी सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळेल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुणे - ‘‘ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार?’’ अशा शब्दांत अभिनेता शरद पोंक्षे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, ‘केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे आतातरी सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळेल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धर्म गर्जना संस्थेतर्फे आयोजित ‘राष्ट्रभक्त सावरकर’ या विषयावरील व्याख्यानात पोंक्षे बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश कर्पे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पोंक्षे म्हणाले, ‘‘पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी सावरकर स्मारकासाठी १५ हजार रुपयांची देणगी स्वतःच्या खिशातून दिली होती. तसेच, गांधी यांच्यामुळेच टपाल तिकिटावर सावरकरांचे छायाचित्र झळकले होते. दुर्दैवाने राहुल गांधी यांना यातील काहीच माहीत नाही. प्रत्येक व्यक्ती हा जन्मतः हिंदू असतो. परंतु, हिंदू म्हटल्यावर त्यामध्ये मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध यांसारख्या विविध धर्मांना वगळता येत नाही. आपले गुणधर्मच आपले खरे धर्म आहे.’’

या वेळी सागर सैंदाणे, राकेश क्षीरसागर, नगरसेवक आनंद रिठे उपस्थित होते. सूत्रसंचालन मंदार परळीकर यांनी केले.

सावरकरांचे विचार कळणे गरजेचे
‘सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ दिलेला चालतो; मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना का नाही चालत? सावरकरांना ‘भारतरत्न’ दिला, तरच नव्या पिढीला त्यांच्या विचारांची व कार्याची जाणीव होईल. नवीन पिढीलाही सावरकर कळणे गरजेचे आहे, असे पोंक्षे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi do not know history of grandmother actor sharad ponkshe statement pune