राहुल गांधींना पंतप्रधानपदाची अजून 15 वर्षे तरी संधी नाही - आठवले

ramdas athwale
ramdas athwale

पुणे - ""राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली; परंतु पंतप्रधानपदासाठी त्यांचा अजून 15 वर्षे तरी नंबर लागणार नाही. त्यामुळे त्यांनी इतक्‍या लवकर इच्छा बोलून दाखवणे चुकीचे आहे,'' अशी उपरोधिक टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. 

आठवले म्हणाले, ""कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत, दलित आणि ओबीसी मतदार भाजपला स्पष्ट बहुमत देतील. रिपब्लिकन पक्षाने 194 जागांवर भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असून, 30 ठिकाणी रिपाइंचे उमेदवार रिंगणात आहेत. 2019 मध्ये केंद्रात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार येईल. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत.'' 

सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटी कायद्यातील अटक करण्याच्या मुद्द्यावर निकाल दिला असला, तरी केंद्र सरकार या कायद्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली असून, वेळप्रसंगी वटहुकूमदेखील काढला जाईल. पदोन्नतीमध्ये आरक्षणाचे विधेयक संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. कोरेगाव भीमा येथील पूजा सकट हिची आत्महत्या की हत्या याची चौकशी करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तरीही चौकशीसाठी त्यांना ताब्यात घ्यावे आणि संबंध नसेल तर सोडून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. छगन भुजबळ यांना अटक केल्यानंतर त्यांना नियोजन करून अडकविले असून, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भूमिका मी सर्व प्रथम मांडली होती. आता ते जामिनावर सुटले असून, त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, असेही आठवले यांनी सांगितले. 

27 मे रोजी रिपाइंचे अधिवेशन 
पुण्यामधील आरटीओ कार्यालयाशेजारी एसएसपीएमएस मैदान येथे 27 मे रोजी रिपाइंचे राज्य अधिवेशन होणार आहे. 
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते हजेरी लावणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com