अपना भिडू बच्चू कडू! बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार? पुण्यात झळकले बॅनर Rahul Gandhi Disqualified

राहुल गांधी प्रकरणावर विरोधक आक्रमक
pune
puneesakal

राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे.

pune
Corona Update: पुणेकरांसाठी धोक्याची घंटा! सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे शहरात, राज्यात तीन जणांचा मृत्यू

पण २ वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याचे पडसाद शुक्रवारी देशभर उमटल्याचे पाहिला मिळाले. तसेच देशातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला. दरम्यान आता याचे पडसाद पुण्यात पाहिला मिळत आहेत. पुण्यात आज शनिवारी राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

pune
LPG Subsidy: केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता त्यांची आमदारकी कधी रद्द होणार असा सवाल बॅनर वरून विचारला आहे.

बॅनरवर लिहिलं आहे की, "अपना भिडू! बच्चू कडू! आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान" असं बॅनरवर लिहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com