शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटेसह दोघांवर गुन्हा दाखल

Rahul-kalate
Rahul-kalate

पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी पिंपरी येथे घडली.

राहुल कलाटे (वय ३५, रा. वाकड) आणि विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनिल महादेव राऊत (वय ५२, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास विनोद मोरे यांनी फिर्यादी राऊत यांना फोन केला. नगरसेवक राहुल कलाटे यांच्या टीडीआर फाईलवर सही का केली नाही म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर कलाटे यांनी फोनवरून राऊत यांना शिवीगाळ केली. त्यानंतर महापालिका भवनातील कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या कार्यालयात राऊत यांच्यावर कलाटे यांनी खुर्ची फेकून मारली. तसेच राऊत यांची गचंडी पकडून सरकारी कामात अडथळा आणला.

याबाबत बोलताना राहुल कलाटे म्हणाले, ''आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजपने रचलेले हे षडयंत्र आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com