शिवराज्याभिषेक सोहळ्याची लक्षवेधी काचप्रतिमा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

विविध रंगांच्या काचांवर प्रकाश पडल्यानंतर ही प्रतिमा उठावदार दिसते. गेली अनेक वर्षे राहुल हे स्टेन्ड ग्लासच्या माध्यमातून काच प्रतिमा तयार करीत आहेत. हे फक्त काचेवरील पेंटिंग नसून विविध रंग व पोत (टेक्‍स्चर्स) असलेल्या इंपोर्टेड काचा वापरून या प्रतिमांची निर्मिती केली जाते. 

पुणे : राहुल लोहकरे यांनी स्टेन्ड ग्लासच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याची लक्षवेधी काचप्रतिमा तयार केली आहे. ही त्यांची शंभरावी प्रतिमा असून, ती त्यांनी नगर येथील शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टसाठी तयार केली आहे. स्टेन्ड ग्लास आर्टिस्ट असलेल्या राहुल यांनी आतापर्यंत विविध विषयांवर अशा प्रतिमा तयार केल्या आहेत. 

आतापर्यंत राहुल लोहकरे यांनी 99 काच प्रतिमा तयार केल्या आहेत. "शिवराज्याभिषेक' ही त्यांची शंभरावी प्रतिमा असून तिचा आकार चार फूट बाय सहा फूट इतका आहे. या प्रतिमेत त्यांनी 8 एलईडी ट्यूब बसविल्या असून केशरी, लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि गुलाबी रंगाची काच वापरली आहे. पारदर्शक आणि अपारदर्शक अशा दोन्ही प्रकारच्या काचा वापरून शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही देखणी काच प्रतिमा त्यांनी तयार केली आहे.

विविध रंगांच्या काचांवर प्रकाश पडल्यानंतर ही प्रतिमा उठावदार दिसते. गेली अनेक वर्षे राहुल हे स्टेन्ड ग्लासच्या माध्यमातून काच प्रतिमा तयार करीत आहेत. हे फक्त काचेवरील पेंटिंग नसून विविध रंग व पोत (टेक्‍स्चर्स) असलेल्या इंपोर्टेड काचा वापरून या प्रतिमांची निर्मिती केली जाते. 

- ई सकाळच्या फेसबुकपेजवर आज दुपारी 4 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे राहुल लोहकरे यांच्याशी संवाद.

Web Title: Rahul Lohkare make portrait Chatrapati Shivaji Maharaj