भाजप नगरसेविकेच्या वडिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

- पुणे कँटोनमेंट बोर्डच्या माजी उपाध्यक्ष व भाजपच्या विद्यमान नगरसेविकेच्या वडिलांच्या जुगार अड्डावर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शनिवारी छापा घातला. 
- एकास अटक करुन दहा हजार रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
- पोलिसांनी जुगार चालकासह 14 जणांना अटक केली.
- ​पुणे कँटोनमेंटच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका व माजी उपाध्यक्ष प्रियांका श्रीगीरी यांचे वडील आहेत.

पुणे : पुणे कँटोनमेंट बोर्डच्या माजी उपाध्यक्ष व भाजपच्या विद्यमान नगरसेविकेच्या वडिलांच्या जुगार अड्डावर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शनिवारी छापा घातला. त्यामध्ये एकास अटक करुन दहा हजार रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी जुगार चालकासह 14 जणांना अटक केली.

राजू जनार्धन श्रीगिरी (वय 50, रा. 1071/24, भीमपुरा, कॅम्प) याच्यासह 14 जणांना अटक करण्यात आली. राजू श्रीगिरी अनेक वर्षापासून कॅम्पमधील भीमपुरा येथे बेकायदा जुगार अड्डा चालवित असल्याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकास खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी रात्री छापा घातला. त्यामध्ये जुगार अड्डा चालविणाऱ्या राजू श्रीगिरी याच्यासह 14 जणांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे कँटोनमेंटच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका व माजी उपाध्यक्ष प्रियांका श्रीगीरी यांचे वडील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid on BJP corporators father's gambling base