पुण्यात मटका व्यावसायिकांवर पोलिसांचे छापे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या मटका व्यावसायांच्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापे घातले. त्यामध्ये पोलिसांनी 39 जणांना अटक करुन त्यांच्याकडून 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या मटका व्यावसायांच्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापे घातले. त्यामध्ये पोलिसांनी 39 जणांना अटक करुन त्यांच्याकडून 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

मटका व्यावसायिकाच्या मुख्य बारा हस्तकांसह मटका खेळण्यासाठी आलेले 27 जण अशा एकूण 39 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती गावातील श्रीनाथ अमृततुल्यजवळील तावरे बिल्डींगच्या तळघरामध्ये मटका व्यावसाय सुरू असल्याची खबर सामाजिक सुरक्षा विभागाच्या अतिरीक्त कार्यभार सांभाळणाऱ्या पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद मोकाशी, पोलिस कर्मचारी अविनाश पवार, प्रकाश मगर, राहुल वंजारी, मयुर दळवी, जयश्री मोरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी छापा घातला. 

मटका व्यावसायिक मामा उंडाळे हा त्याच्या बारा हस्तकांमार्फत संबंधीत ठिकाणी मटका व्यावसाय चालवित असल्याची माहिती बारा जणांना अटक केल्यानंतर पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी तेथे मटका खेळण्यासाठी आलेल्या 27 जणांनाही अटक केली. त्यांच्याकडून 69 हजार 800 रुपये रोख व नवशे रुपयांची जुगाराची साधने जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid on lottery sellers in Pune