पुण्यात 'स्पा'वर छापा; वेश्या व्यवसायातून दोघींची सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

पुणे (औंध) : येथील विवांत 'फॅमिली थाई स्पा'मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने व चतु:श्रूंगी पोलीसांनी संयुक्तपणे छापा टाकला. 'स्पा' मालकासह दोघांना अटक करून दोन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी, 'स्पा' मालकासह दोघांवर चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती  चतु:श्रूंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली.  

प्रसाद सुरेंद्र कांबळे (वय २९, रा. केशवनगर, चिंचवड), डेव्हीड उर्फ डेमखोसेह हाऊसकिफ (वय २७, रा. कोंढवा, मूळ रा. मणिपूर) यांना अटक करण्यात आली आहे. औंधमधील अक्षय कॉम्प्लेक्स या इमारतीत विवांत 'फॅमिली थाई' मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या नरेश बलसाने व ज्ञानेश्वर देवकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे व पथकाने संबंधित 'स्पा' बद्दल खातरजमा केली असता.

'स्पा' मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. सामाजिक सुरक्षा विभाग व चतु:श्रूंगी पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथे छापा टाकला. तेथे दोन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळले. संबंधित मुलींची सुटका करून कांबळे व डेव्हीड या दोघांना अटक करून मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले. अटक केलेल्या दोघांकडून मोबाइल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले .

Web Title: raid on 'Spa' in Pune; two girls released from prostitution business