एल्गार परिषद प्रकरणी स्टॅन स्वामींच्या घरावर छापा; डिजीटल स्वरुपातील माहिती जप्त

सकाळ वृ्त्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

पुणे : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या रांची येथील घरावर पुणे पोलिसांचा छापा टाकला. दरम्यान, शहरी माओवादप्रकरणी त्यांच्या घरातून डिजीटल स्वरूपातील माहिती जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. 

एल्गार परिषद प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. या प्रकरणात यापुर्वी संशयीत शहरी माओवादी म्हणून अटक करण्यात आलेल्या विचारवंताशी स्टॅन यांचा संपर्क असल्याचे समोर आले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी पुणे पोलिसांनी रांचीतील नानकुम भागात स्टॅन यांच्या घरावर छापा टाकला.  तेथे घराची झडती घेण्यात आली. तेथून डिजीटल माहिती जप्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on Stan Swamys house in Elgar Council case and Digitized information seized