रेल्वे बुकिंग झाले सोपे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे - लोकलच्या प्रवाशांसाठी रेल्वेने गेल्या एप्रिल महिन्यापासून ‘यूटीएस ॲप’द्वारे ऑनलाइन ई-तिकीट बुकिंगची सुविधा सुरू  केली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये २३ हजार प्रवाशांनी या ॲपचा लाभ घेतल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या सुविधेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे- लोणावळा दरम्यानच्या विविध तिकीटघरांवर प्रवाशांची नेहमी गर्दी होत असते. लोकलच्या प्रवाशांना याचा त्रास नेहमीच सहन करावा लागत असे. तसेच, गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणेवर देखील ताण येत होता. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळावी, यासाठी प्रशासनाने ‘ई तिकीट’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सध्या पुणे- लोणावळा लोकलच्या तिकिटांसाठी सुरू आहे. मात्र, यापुढील काळात ही सेवा लांब पल्ल्याच्या तिकीट बुकिंगसाठी देखील राबविण्याचा विचार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

प्रवाशांना तिकीट मिळवताना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी ‘यूटीएस ॲप’ची सेवा सुरू केली आहे. तसेच ई-तिकिटाच्या माध्यमातून तिकीट प्रणाली ‘पेपरलेस’ होण्याकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. ही सेवा सध्या उपनगरांतील स्थानकांवरील प्रवाशांसाठी उपलब्ध असून, लवकरच ती सर्व स्थानकांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Rail booking is easy