"रेल्वे अपघातातील मृतांना दहा लाख द्यावेत'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे : विमासंरक्षण देण्यासाठी प्रत्येक तिकिटामागे एक रुपया आकारणाऱ्या रेल्वे प्रशासनाने पाटणा-इंदूर एक्‍स्प्रेस अपघातील मृतांना दहा लाख रुपयांऐवजी साडेतीन लाख रुपये देण्याचे मंजूर केले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा रेल्वे प्रवासी संघटनांनी निषेध केला असून ही प्रवाशांची फसवणूक असल्याची टीकाही केली आहे.

काही महिन्यांपूर्वी एक रुपयात दहा लाखांचा विमा उतरविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून केली होती. त्यानुसार देशातील प्रत्येक रेल्वे प्रवाशांकडून तिकिटांद्वारे विम्याचा एक रुपया वसूल केला जात आहे. त्यातून विम्याची ही रक्कम दिली जाणार होती. असे असताना रविवारी पहाटे पाटणा-इंदूर एक्‍स्प्रेसचे चौदा डबे रुळावरून घसरून भीषण अपघात झाला. त्यातील मृतांना साडेतीन लाख; तर जखमींना पन्नास हजारांची भरपाई घोषित केली. त्यावर शहरातील विविध रेल्वे प्रवासी संघटनांकडून या घोषणेचा निषेध करण्यात आला आहे.
रेल्वेची दहा लाख रुपये विम्याची घोषणा हवेत विरली असून, रेल्वेने प्रवाशांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे; तसेच तिकिटामागे एक रुपया जादा आकारल्यामुळे रेल्वेला दररोज तब्बल अडीच ते तीन कोटींचे जादा उत्पन्न मिळते. त्यामुळे रेल्वेने अपघातातील मृतांना दहा लाख; तर जखमींना पाच देणे गरजेचे आहे, असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी म्हटले आहे.

सेफ्टी कमिशनर काय करत होता?
इंदूर आणि पाटणा ही दोन्हीही जंक्‍शन मोठी आहेत. येथे दहा-दहा मिनिटांनी रेल्वे गाड्या धावत असतात. त्यामुळे लोहमार्गावर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत का, रेल्वेचे डबे चांगल्या स्थितीत आहेत का, रेल्वे डब्यांचा मेंटेनन्स केला गेला आहे का, या गोष्टींची पाहणी का करण्यात आली नाही, या सर्व गोष्टींची पाहणी करण्याचे काम सेफ्टी कमिशनरचे असते. त्यामुळे सेफ्टी कमिशनर काय करत होता, असा सवाल शहा यांनी केला.

Web Title: railway accident victim families should get 10 lac