16 हजार फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची कारवाई 

Railway administration has taken action against 16 thousand traveler who travel without ticket
Railway administration has taken action against 16 thousand traveler who travel without ticket

पुणे : मळवली, बारामती, मिरज, मिरज- कोल्हापूर आदी रेल्वे मार्गांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात कारवाई करून सुमारे 16 हजार फुकट्या प्रवाशांकडून सुमारे एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

या कारवाईतंर्गत प्रवासाचे योग्य तिकिट न बाळगणे, कमी अंतराचे तिकिट काढून दूरच्या अंतरावर प्रवास करणे, आरक्षित डब्यातून साध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यात 37 हजार प्रकरणांत दोन कोटी 7 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यात 16 हजार 106 फुकट्या प्रवाशांचा समावेश आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेने केलेल्या कारवाईत 36 हजार प्रकरणांत सुमारे दोन कोटी चार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर तसेच अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com